जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर :

जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. साठी कोव्हिड-19 संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह पर्यटक / नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

या ठिकाणी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणालींचा अवलंब करणे बंधनकारक राहील तसेच या ठिकाणी आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्क वापरणे व वेळोवेळी हात निर्जंतुकीकरण करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!