आमदार पी.एन.पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड : कार्यकर्त्यांत उत्साह
कोल्हापूर :
केडीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार ही चर्चा जोर धरली असता आज पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेनंतर सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांचीही निवड बिनविरोध झाली.
आमदार पाटील यांनी यापूर्वी पाच वर्षे चेअरमन म्हणून विशेष काम केले होते. तसेच संचालक पदी ते चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आले. आमदार पाटील यांची करवीरमधील विकास संस्था गटात मजबूत पकड आहे.
आज त्यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यात उत्साह पसरला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
करवीर विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडिया व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.