दहावी पास उमेदवारांना सैन्यात नोकरीची  संधी

Tim Global :

Army Ordnance Corps AOC Recruitment 2023 : दहावी पास झालेल्या उमेदवारांना सैन्यात नोकरी करण्याची  संधी  आहे.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) ने २०२३-२४ या वर्षासाठी भरल्या जाणार्‍या ट्रेड्समन आणि फायरमन पदांसाठी १७९३ जागांवर भरती निघाली आहे.. AOC भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ फेब्रुवारी २०२३ पासून http://www.aocrecruitment.gov.in या वेबसाईटवर सुरु करण्यात आली आहे.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती २०२३ साठी पात्र उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्ट अशा ४ टप्प्यांत केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अधिकची माहिती खाली देण्यात आली आहे.



या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. ट्रेडसमन मेट या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असणं आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ते २५ वर्षादरम्यान असावे. आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत देण्यात आली आहे.

चाचणी –

उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!