करवीर :
वाकरे ता.करवीर येथील श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2020/21 या आर्थिक वर्षात 1 कोटी 3 लाख इतका ढोबळ नफा झाला आहे. गेले वर्षभर कोरोना साथीमुळे व्यवहारात आर्थिक मंदी असतानाही संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक व्यवहार करून मार्चअखेर 31 कोटी 60 लाख ठेवी,व पंचवीस कोटी दहा लाख कर्जाचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णा माने, उपाध्यक्ष मधुकर तोडकर व सर्व संचालक, सचिव पांडुरंग बिरंजे यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष माने म्हणाले , संस्थेचे खेळते भांडवल 39 कोटी 50 लाख आहे, गुंतवणूक 11 कोटी,व निधी 4 कोटी 66 लाख इतका आहे. भविष्यात संस्था सर्व सभासदांना, खातेदारांना नेट बँकिंग, मोबाईल ॲप सुविधा पुरवणार आहे.
यावेळी संचालक शंकर पाटील, शिवाजी पाटील, हिंदुराव पाटील, शिवाजी सूर्यवंशी, अरुण आळवणे, रघुनाथ कांबळे, दिलीप शिंदे ,हिंदुराव द. पाटील, अमीत पाटील ,अनुसया करपे, नीता माने, असिस्टंट मॅनेजर श्रीपती पाटील ,शाखाधिकारी रायबा पाटील,बळवंत पाटील, सुरेश तोडकर,कर्मचारी,पिग्मी एजंट उपस्थित होते.