पुणे :
अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रीय झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने तापमानामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे.यामुळे राज्यात शुक्रवारपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाल्याने, पारा ४० अंश सेल्सिअस वर गेला आहे. परिणामी राज्यात अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.येत्या दोन दिवसात वातावरणात आणखी वेगाने बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे .
यामुळे राज्यात कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अशा १६ जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.