करवीर :

शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघात सदस्या रसिका अमर पाटील यांनी १४ कोटीची विकास कामे केलीत,मतदार संघाचा विकास केला आहे. असे प्रतिपादन के.डी.सी.बँकेचे माजी चेअरमन व्ही.बी पाटील यांनी केले. शिंगणापूर येथे जिल्हा वार्षिक नियोजन मधून ३४ लाख रुपये खर्चातून बांधलेल्या शाळा इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फित कापून,व झाडाच्या रोपट्याला पाणी घालून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पाटील म्हणाले गावात ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे,रस्ते व विविध विकास कामासाठी भरीव निधी अमर पाटील यांनी खेचून आणला आहे.
यावेळी जि.प. सदस्या रसिका पाटील म्हणाल्या, मतदार संघात नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळवून देणे, रस्ते, बांधकाम अशा सुविधा पुरविण्यावर आपण भर दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील म्हणाले,जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावासह मतदार संघात राजकीय मतभेद विसरून मतदार संघाचा विकास केला आहे. यासाठी गावातील नागरिकांनीही पाठबळ दिले आहे .
यावेळी सरपंच प्रकाश रोटे, कृष्णात चौगले, यांचे मनोगत झाले, मुख्याध्यापक वसंत देसाई यांनी प्रास्ताविक केले. अध्यापिका रंजीता काळेबेरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रामसेविका जी.बी.जाखलेकर पांडुरंग पाटील, वनिता सुतार, अर्जुन मस्कर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.