पुणे :
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात शुक्रवार पर्यंत विजांसह मेघगर्जना व गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले असून यामुळे थंडी कमी होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. बुधवार १७ रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा ,सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे,जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडील वाहणार्या वार्यामुळे कर्नाटक किनारपट्टी पर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यासोबत होत असलेला बाष्प पुरवठा आणि उत्तरेकडून थंड वार्याचा वाहत असलेला प्रवाह यामुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.