शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना

कोल्हापूर :

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासुन शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडून काही घटनांमध्ये परीस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली असल्याने भा.द.सं. कलम 363 नुसार दाखल गुन्हयात तसेच मिसींग सारख्या घटनांमध्ये देखील अचानकपणे जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच मोठया प्रमाणात यात्रा, उरुस इ. साजरे होणार आहेत. या दरम्यान वरील पार्श्वभूमीवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवून जिल्हयात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता, दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 13 मे 2023 रोजी रात्रौ 24.00 वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केले आहेत.

कलम 37 (1) अ ते फ :-
अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा लाठयाकिंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. (ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. (क) दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. (ड) व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. (इ) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. (फ) ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशाकिंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.

कलम 37 (3) :-
कोल्हापूर जिल्हयामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याचे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!