गोकुळ : महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी
कोल्हापूर ता.०२ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे व संचालक मंडळ यांनी प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, ०२ ऑक्टोबर १८६९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म झाला होता. तर याच दिवशी १९०४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ही जन्म झाला होता. जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, तर साधेपणा आणि विनम्रतेचे प्रतिक असलेले लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देवून जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला. अशा या थोर व्यक्तींचे देशाच्या जडणघडणी मध्ये लाखमोलाचे योगदान आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले यांनी प्रास्तावीक व संचालकाचे स्वागत केले व आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे , माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील , संचालक बाबासाहेब चौगले,नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी ,पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुंरबेकर,विजय कदम दत्तात्रय वाघरे ,संभाजी पाटील भानुदास पाटील ,संग्राम मगदूम संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.