राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सत्यजित जाधव यांचा पाठिंबा
आजरा :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळच्या ) निवडणुक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. आज आजरा येथे भुदरगडचे माजी सभापती सत्यजित जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला.

गोकुळ निवडणुकीची तारीख जवळ येईल तशी सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाकडून जोरदार खलबते होत आहेत. आजरा येथील मेळाव्यात जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या आघाडीला बळ मिळाले आहे.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आघाडीचे उमेदवार, जाधव यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.