एक कोटी छप्पन्न लाखांचा नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील ( १५ टक्के लाभांश, यशवंत बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा
करवीर :
यशवंत बँकेला एक कोटी छप्पन्न लाखाचा नफा झाला असून पंधरा टक्के लाभांश दिल्याचे जाहीर केले. आरबीआयच्या नियमानुसार नोकर भरती केली असून वसुलीचे प्रमाणही चांगले आहे. ११५ कोटी १५ लाख कर्ज वाटप केले आहे. शून्य टक्के एन पी ए असून तीन नवीन शाखा सुरू केल्याचे सांगून मोबाईल बँकिंग सुरू करणार असल्याचे
अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.
चर्चेदरम्यान अमर पाटील यांनी एका पंचवार्षिक मध्ये दोन वेळा भरती केली ,ती नियमबाह्य असून या भरतीबाबत संघटनांनी बँकेची बदनामी केली. त्यांना खुलासा का केला नाही याबद्दल सत्ताधाऱ्यांवर नाराजी निषेध व्यक्त केली. प्रा. बी बी पाटील यांनी प्रमाणापेक्षा जास्त नोकर भरती केली असून सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. डिझेल खर्चात वाढ झाली, ठेवी व कर्जात फक्त १४ लाखांनी नफा वाढल्याची टीका केली. संजय पाटील यांनी ठेवी किती वाढल्या, कर्जे किती दिली याचे आकडे लपवण्याचा आरोप केला.
उत्तम देसाई, नामदेव पाटील यांनी उत्कृष्ट कामाबद्दल संचालकांचे अभिनंदन केले. दत्तात्रय पाटील, विठ्ठल पाटील, एम.जी.खाडे, टी.डी.कदम, उत्तम कसोटे , सागर पाटील कोपार्डे , सुरेश रांगोळकर,
जोत्स्ना पाटील ,युवराज चौगले ,भूषण पाटील, सदाशिव शेलार यांनी मुद्दे मांडले. विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी मानले.सभेला सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.