सचिन पाटील ‘गोकुळ’ चे नवे जनसंपर्क अधिकारी
करवीर :
गोकुळ दूध संघाच्या नूतन जनसंपर्क अधिकारी पदी नूतन चेअरमन विश्वास नारायण पाटील यांचे अत्यंत विश्वासू असे सचिन महादेव पाटील ( शिरोली दुमाला, ता.करवीर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर बदलाचे वारे वाहू लागले होते. निवडणुकीच्या आधी जनसंपर्क अधिकारी पदी संजय दिंडे यांच्या जागी पी.आर.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता निवडणुकीनंतर पी आर यांची बदली दूध प्रकल्प येथे करून नूतन जनसंपर्क अधिकारी म्हणून सचिन पाटील यांना संधी मिळाली आहे.
सचिन पाटील हे चेअरमन विश्वास पाटील आबाजी यांचे निकटवर्तीय आहेत. आबाजींचे स्वीय सहायक म्हणून ते कार्यरत होते. गोकुळ संघात बारा वर्षांपूर्वी सचिन पाटील यांनी सुपरवायझर म्हणून सेवेला प्रारंभ सुरुवात केली होती. आज त्यांच्यावर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या मोठ्या संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी पदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. निवडीनंतर सचिन पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.