‘कुंभी’वर बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणार : अध्यक्ष चंद्रदीप नरके (कुंभी कासारी साखर कारखाना ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा)
करवीर :
कारखान्याने गतवर्षी सहा लाख टन गाळप करून सात लाख ६३ हजार साखर क्विंटल उत्पादन घेतले. इथेनॉल प्रकल्प या हंगामापासून कार्यान्वित होत असून केंद्राने एफआरपी प्रमाणे साखरेला ४५ रुपये किमान दर बांधून द्यावा. ‘ कुंभी ‘ वर बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणार असल्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
‘ बांधा, वापरा व हस्तांतरित करा ‘ या तत्त्वावर कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती प्रकल्पाला सभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी ज्यादा दर देण्यासाठी २३५ कोटी आयकर माफ केल्याने पंतप्रधान ,मुख्यमंत्री, संघटना यांचे आभार मानले. नोटीस वाचन सचिव प्रशांत पाटील यांनी केले.
यावेळी श्रीकांत पाटील यांनी कारखान्यावर माती परीक्षणलॅब व्हावी, उसाची रोपे मिळावी, शंभर शेतकरी प्रतिनिधींना अभ्यास दौऱ्यासाठी पाठवावे ही मागणी केली. बाजीराव पाटील यांनी ५ हजार ठेवीच्या पावत्या किती केल्या हे सांगावे, सर्जेराव भोसले यांनी व्यवस्थापन खर्च एक कोटी ज्यादा केला, रस्ते दुरुस्तीसाठी २८ लाख खर्च केला, शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४०० रुपये मागील जादा पैशाची मागणी करून एकूण कर्ज किती फेडली किती हे सांगावे अशी मागणी केली. सदाशिव शेलार यांनी गाळप क्षमता वाढवा अशी मागणी केली.
याप्रसंगी बाळासाहेब खाडे यांनी, साखर तारण , ठेवी, देणी ,चालू देणे व तरतुदी २४० कोटी कर्ज, भांडवली १८४ कोटी कर्ज असे प्रश्न मांडून
नवीन कर्ज काढताना ४५ कोटी कर्ज वाढल्याचे सांगून बायोगॅसचा डीपीआर करावा, टेंडर करावी, विशेष सभा घेऊन परवानगी घ्यावी अशी मागणी केली.
राजेंद्र सूर्यवंशी यांनी सीए यांनी सोयीने अहवाल केल्याचे सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत बायोगॅस साठी दहा वर्षाची मुदत घ्यावी अशी मागणी केली. पांडुरंग शिंदे, पंडित कांबळे, पुंडलिक पाटील ,संभाजी पाटील, भगवान पाटील , गणपती पाटील महादेव चौगले यांनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले, मुद्रांक शुल्क व स्टॅम्प ड्युटी मध्ये वाढ झाली आहे. दिलेला खर्चासहित अंतिम दर असून एफ आर पी तोटे करून दिल्यामुळे कर्ज वाढले आहेत असे सांगीतले. ३७९ कोटी खेळते भांडवल असून ६५ कोटीची साखर शिल्लक आहे. कर्जाचे हप्ते व्यवस्थित वेळेवर सुरू आहेत. केडीसी मधून कर्ज घेऊन इतर कर्जे परतफेड केली, यामुळे ठेवी व देणी कमी झाली आहेत. चौकशी अंती स्लिपबॉय वर कारवाई करू, कोजन डिस्टिलरी फायद्यात आहे, तोट्यात असेल तर राजीनामा देतो असे आवाहन केले. शेवटी राष्ट्रगीत होऊन सभा संपली आभार उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी मांनले. यावेळी कुंभी बँकचे अध्यक्ष अजित नरके, कारखान्याचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.