जनावरांच्‍या आयुर्वेदिक औषधोपचाराचे गोकुळमार्फत स्‍वयंसेवकांना प्रशिक्षण

कोल्‍हापूर :

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या आनंदराव पाटील – चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत दूध संस्था सदस्‍य, सचिव व दूध उत्‍पादक शेतकरी, महिलांना प्रशिक्षण दिले जाते. यावेळी पशुसंवर्धन विभाग मार्फत आर. बी. पी. स्‍वयंसेवकांना जनावरांच्‍या मधील आयुर्वेदिक औषधोपचार या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज ताराबाई पार्क येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये गोकुळचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांचे हस्‍ते करण्‍यात आले. प्रस्‍ताविक पशुसंवर्धन विभागाचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. व्‍ही मोगले यांने केले.


आर.बी.पी स्‍वयंसेवकांना देण्‍यात येणारे प्रशिक्षण वर्ग दोन दिवस चालणार आहे. या मध्‍ये जनावरांच्‍या आजारामधील आयुर्वेदिक उपचार पध्‍दतीचे महत्‍व व त्‍याची उपयोगीता, हर्बल गार्डन व्‍हीजीट व आर्युवेदिक औषधोपचारामध्‍ये उपयोगी येणा-या वनस्‍पती व पदार्थाची ओळख व त्‍यांचे गुणधर्म,प्रथामीक आयुर्वेदिक औषधोपचारामध्‍ये केंद्रामध्‍ये स्‍वयंसेवकांनी जबाबदारी व कार्यपध्दीती, जनावरांचे आजार व त्‍यासाठी वापरण्‍यात येणारी उपचार पध्‍दती आशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्‍ये जिल्‍ह्याती आर.बी. पी. स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. गोकुळ दुध संघामार्फत दुध व्‍यवसाय वाढीसाठी विविध योजना राबवून दूध उत्पादन किफायतशीर होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जाते. असे प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम घेऊन दूध उत्पादक शेतक-यांना प्रशिक्षण द्यावे श्री. पाटील यांनी संगितले व आभार डॉ.विजय मगरे यांनी मानले.

यावेळी सहा. व्‍यवस्‍थापक डॉ. पी.जे.सोळुके, डॉ.दळवी,डॉ.कामत, डॉ.मगरे, डॉ.गो-हे व संघाचे अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!