महत्त्वाची बातमी : परिक्षांच्या तारखा जाहीर TET SET : जाणून घ्या वेळापत्रक

पुणे :

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परिक्षा(SET) या दोन्ही परिक्षांच्या तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे या दोन्ही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू असून या परिक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत म्हणजे २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे.

इच्छुक उमेदवार https://mahatet.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. ही परिक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. मात्र करोना प्रादुर्भावामुळे या तारखेत बदल होण्याची शक्यता परिक्षा परिषदेने वर्तवली आहे.

नोंदणीची अंतिम तारीख-२५ ऑगस्ट २०२१
प्रवेशपत्र मिळण्याची तारीख- २५ सप्टेंबर २०२१,
परिक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ (सकाळी १०.३० ते दुपारी १.००),
परिक्षा पेपर २- १० ऑक्टोबर २०२१ (दुपारी २.०० ते संध्याकाळी ४.३०).

राज्य पात्रता परिक्षा(SET)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेणाऱ्या येणाऱ्या राज्य पात्रता परिक्षेची(SET) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादीही विद्यापीठाने https://setexam.unipune.ac.in/Home.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. परिक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी विद्यार्थी आपले प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन थेट डाउनलोड करु शकतात. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाकडे लक्ष द्यावे लागणार आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!