सहकारातून कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती : माजी आमदार चंद्रदीप नरके
करवीर :
करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात सहकारामुळे शेतकरी व ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासात झाला आहे.यामुळे जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे.येथील राजर्षी शाहू सहकारी दूध संस्था व सहकारी राजर्षी शाहू सहकारी
नागरी बिगर शेती पतसंस्थे पारदर्शक व महत्त्वाचे कार्य आहे असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले .
खुपिरे पैकी शिंदेवाडी ता करवीर येथील राजर्षी शाहू सहकारी दूध संस्था व सहकारी नागरी बिगर शेती पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन चंद्रदिप नरके यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते .यावेळी गोकुळ संचालक अजित नरके, एस आर पाटील ,कुंभी कासारी कारखान्याचे संचालक संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार चंद्रदिप नरके म्हणाले सहकारी पत संस्था व दूध संस्थानी ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक आधार दिला आहे. यामुळे शैक्षणिक सामाजिक व राजकीय असा सर्वांगीण विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे. करवीर मध्ये ग्रामीण भागातील जनता कष्टाळू असून आपल्या हिमतीच्या जोरावर सहकारी संस्थांना सुवर्ण योग निर्माण केले आहे असे सांगितले.
यावेळी दूध संस्थेचे अध्यक्ष बळवंत सुतार, उपाध्यक्ष मंगल पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासो चव्हाण, उपाध्यक्ष राजाराम पाटील, उपसरपंच संदीप शिंदे ,आनंदा चव्हाण, नाथाजी शिंदे, सरदार चव्हाण, भैरवनाथ शिंदे, राजाराम पाटील, ज्योतीराम पाटील, गुंडा पाटील, धोंडिराम शिंदे,सागर पाटील,अंबाजी पाटील व ग्रामस्थ सभासद उपस्थित होते.