महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते मा.श्री.अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर :२० कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे यांनी कोल्हापूर शहरातील वाशी नाका परिसरात नव्याने सुरु केलेल्या हॉटेल ‘चिरंजीवी’या हॉटेलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते मा.श्री.अजित पवार यांच्या शुभहस्ते तर माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षेतेखाली व आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले कि ‘ग्राहकांना उत्तम सेवा, आदरतिथ्य, आणि गुणवत्तापूर्ण जेवण देत हॉटेलचा नावलौकिक वाढवा.’अशा शुभेच्छा देत पवार म्हणाले, ‘ कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची क्षमता आहे. निसर्गाची देणं आहे, उद्यमशीलता आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी हा लौकिक आहे. अभिषेक डोंगळे यांना हॉटेल व्यवसायाविषयी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हॉटेल चिरंजीवी चे प्रोप्रायटर अभिषेक डोंगळे यांनी प्रास्ताविक मध्ये हॉटेल चिरंजीवीचे काम हे ५,००० चौरस फुटामध्ये झाले असून यामध्ये खालील बाबी व सुखसोयींचा समावेश आहे .तळमजल्यावर २,१०० चौरस फुटमध्ये बॅन्क्वेट हॉल, डायनिंग,स्टोअर रूम याचा समावेश आहे. ग्राउंड फ्लोअर यामध्ये रेस्टॉरंट, मिनी चिल्डन पार्क, रिसेप्शन, ऑफिस इ.बाबींचा समावेश आहे.पहिल्या मजल्यावर वातानुकूलित असा १५० आसन क्षमतेचा बॅन्क्वेट हॉलचा समावेशआहे. दुसरा व तिसरा मजल्यावर वातानुकूलित वायफाय कनेक्टीव्हिटी असलेल्या १५ रूमचा समावेश आहे सर्व मजल्यासाठी लिफ्टची सोय आहे अशी सविस्तर माहिती यावेळी दिली.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अभिषेक डोंगळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले तर तसेच आभार राजीव सूतगिरणी चे संचालक संदीप डोंगळे यांनी मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते मा.श्री.अजित पवार , माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार पी,एन,पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे विद्यमान चेअरमन विश्वास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,गोकुळचे दूध संघाचे संचालक, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.