राधानगरी :
कारखान्याचा कारभार काटकसरीने करून सभासद व कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटीबध्द असून सर्वच घटकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी
शाहूनगर परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सत्यनारायण पूजेने सांगता करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक बी.आर.पाटील आवळीकर व त्यांच्या पत्नी सौ. आनंदी पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.
कारखान्याने चालू गळीत हंगामात ११६ दिवसात ४ लाख ९२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक के.एस.चौगले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.