हरितगृह शेडनेटगृह उभारणीचे
प्रस्ताव सादर करण्यासाठी जाणून घ्या
माहिती
कोल्हापूर :
हरितगृह / शेडनेटगृह / केबल अॅण्ड ‘पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणा-या कंपन्या /सेवा पुरवठादार यांना नोंदणीकरिताचे प्रस्ताव सादर करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. इच्छुक सेवा पुरवठादार यांनी विहित अटी व शर्तीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीकरिताचे प्रस्ताव संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, पुणे-५ या कार्यालयास एका महिन्याच्या आत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
बँक गॅरंटी राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच शेड्युल्ड बँकेत जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोरोना सदृश्य परिस्थिती व लॉकडाऊनमुळे ज्या सेवा पुरवठादारांची आर्थिक उलाढाल सन २०२०-२१ मध्ये कमी आहे त्यांच्याकरिता सन २०१७-१८ पासूनचा सलग तीन वर्षाच्या आर्थिक उलाढालीचा सनदी लेखापालाचा अहवाल ग्राह्य धरण्यात येईल.
सन २०२१-२२ साठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह / शेडनेटगृह / केबल अॅण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणा-या कंपन्या सेवा पुरवठादारांची नोंदणी प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय नोंदणी राबविण्याबाबतची कार्यपध्दती, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे इ. बाबतचा सविस्तर तपशील -v.mahanhm.in व http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.