शेतकऱ्यांनी पीक लागवडीची हंगाम निहाय
सातबाऱ्यावर तलाठ्यांमार्फत नोंदणी करावी
कोल्हापूर :
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भात, नाचणी त्याच बरोबर इतर पिकाच्या लागवडी पूर्ण झालेल्या आहेत व या पीक लागवडीची हंगाम निहाय नोंद सातबाऱ्यावर तलाठ्यांमार्फत करुन घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटींग फेडरेशनचे शासननियुक्त संचालक नंदकिशोर सुर्यवंशी यांनी केले आहे.
शासनामार्फत शेती विषयक विविध योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी शेतकऱ्यांच्या कागदपत्रासोबत त्या त्या हंगामातील पिकाच्या लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला सातबाऱ्याची गरज असते. शेतकरी सातबाऱ्यावरील नोंदीकडे गांभिर्याने लक्ष देत नाही त्यामुळे योजनांपासून वंचित राहतात. पीक विमा योजना, जंगली जनावरापासून होणारे नुकसान भरपाई मिळणे, पूर परिस्थिती, विजेच्या तारापासून होणारे धोके, शासनाच्या धान खरेदी योजनेमध्ये सहभागी होणे इत्यादीसाठी सातबारा उताऱ्यावर पीक लागवडीच्या नोंदी आवश्यक आहेत.
यावर्षीचा धान खरेदीचा (भात) 2 हजार 040 प्रति क्विंटल तसेच नाचणी पिकाचा दर 3 हजार 578 प्रति क्विंटल आहे.