पहिल्या टप्प्यात २३ हजार ८४१ नागरिकांचे लसीकरण
करवीर :
शहराच्या भोवती पसरलेल्या करवीर तालुक्यात कोरोना लसीकरण्यासाठी नागरिकात उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षावरील दीड लाख पात्र नागरिकांपैकी केवळ २३ हजार ८४१ नागरिकांनी ४ एप्रिल पर्यंत कोविडशील्ड लसीकरण करून घेतले आहे. आरोग्य विभाग सर्व पातळीवर लोकांच्यात प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा अडीच प्लॉटचा करवीर तालुका आहे. या तालुक्यात शहरातील काही भाग, उपनगरांसह ११७ गावे व १२ वाड्या वस्त्या येतात. पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाइन कर्मचारी व ४५ वर्षावरील कोमॉरबीड नागरिकांना कोरोना लसीकरण साठी प्राधान्य देण्यात येत होते. मात्र ४५ वर्षे वयावरील सर्वांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाकडून तालुक्यातील ९ आरोग्य केंद्रे १८ उपकेंद्रे खुपीरे ग्रामीण रुग्णालय व गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय अशा २९ ठिकाणी कोरोना लसीकरणाचे काम सुरू होते .
पण लोकांच्यातून लसीकरणासाठी उदासीनता दिसत आहे. ४५ वर्षा वरील वयोगटातील दिड लाख पात्र नागरिकांपैकी केवळ २३ हजार ८४१ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे.करवीर तालुक्यात शहरालगतच्या पाचगाव,मोरेवाडी,गांधीनगर, उजळाईवाडी ही मोठी गावे शहराशी दरोजचा संपर्क येत असल्याने हॉटस्पॉट बनू लागले आहेत. तालुक्यात २४ रुग्ण कोरोना बाधित आहेत. पण किमान ११२ गावात कोरोनाला आज अखेर गावाबाहेर रोखण्यात यश मिळवले आहे.
शासकीय पातळीवर आरोग्य विभाग तहसीलदार गटविकास अधिकारी सर्वांनी मिळून लसीकरणासाठी गती देण्या बाबत आराखडा तयार केला आहे लोकांच्या मध्ये जनजागृती व प्रबोधनासाठी प्रयत्न सुरू असून लसीकरणाची मोहीम आणखी गतिमान करून लवकरात लवकर उद्दिष्ट पूर्ण करणार आहे.
जी. डी. नलवडे तालुका आरोग्य अधिकारी
लसीकरण दृष्टिक्षेपात
४५ वर्षावरील पात्र नागरिक –दिड लाख
लसीकरण –२३ हजार ८४१
एकूण गावे — १२९
लसीकरण केंद्रे — २९,सद्या सर्वत्र लसीचा तुटवटा