हनुमान सोसायटी अध्यक्षपदी पांडूरंग पाटील,
संजय भाऊ दिंडे बोरूडकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
करवीर :
येथील श्री हनुमान विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी श्री हनुमान शेतकरी सेवा आघाडीचे पांडूरंग विष्णु पाटील माजगावकर यांची व संजय भाऊ दिंडे बोरूडकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विजयी पॅनेलचे नेतृत्व यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, संचालक आनंदा लहू पाटील, हंबीरराव गायकवाड, माजी सरपंच बाळ पाटील, अजित सर्जेराव पाटील, विष्णू हरणे यांनी केले.
या गटाने सर्वच १७ जागावर विजय संपादन करून ३० वर्षानंतर सत्तांतर घडवून आणले. कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष संभाजी ज्ञानू पाटील व कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरूण पाटील यांच्या नेतृत्वाखालील हनुमान स्वाभिमानी आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. करवीर सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी नुतन सदस्य आनंदराव लहू पाटील, महादेव विठ्ठल माळी, अशोक दत्तात्रय पाटील, महादेव कृष्णा पाटील, ज्ञानदेव पांडूरंग पडवळ, संजय रंगराव पाटील, अजित आनंदा पाटील, गुणाजी हणमंत शेलार, नामदेव रंगराव तोरस्कर, सुभाष गणपती निरूके, जोत्स्ना सरदार पाटील, विजयमाला उदयसिंह आडनाईक, दत्तात्रय ज्ञानू कुंभार, आनंदा परसू भास्कर, अमित आनंदा कोळी उपस्थित होते. यावेळी सदाशिव विष्णू पाटील व तुकाराम बापू हरणे यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली.