हसूर दुमाला येथे कै. भाई सी. बी. पाटील विद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू नम्रता पाटील हिचा सत्कार
करवीर :
हसूर दुमाला ता. करवीर येथील कै. भाई सी. बी. पाटील विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. नम्रता नामदेव पाटील हिची १८ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली. सदर स्पर्धेमध्ये नम्रताच्या नेत्रदीपक खेळामुळे भारताला रौप्यपदक प्राप्त झाले. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल नम्रताचा भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ नवजवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम खराडे यांचे अध्यक्षेतेखाली व प्रमुख पाहुणे मा. माजी आमदार संपतराव शामराव पवार पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी क्रिडा शिक्षक श्री. डी.एस.पाटील सर मार्गदर्शक श्री. दिपक पाटील सर व लहाने सर यांचाही सत्कार करणेत आला. मुख्याध्यापिका सौ. जाधव ए. ए. यांनी स्वागत केले क्रीडा शिक्षश्री. डी. एस. पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन श्री. एन. के. ताम्हणकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी बाबासाहेव देवकर, सरदार पाटील, सचिव आनंदा शेटे, उपाध्यक्ष राजाराम पाटील संस्थेचे सर्व संचालक हसूर दुमालाच्या सरपंच सौ. सरिता पाटील भाटनवाडीच्या सरपंच सौ. जयश्री परीट हिरवडे चे सरपंच नदीम मुजावर माजी पंचायत समिती सदस्या सविता पाटील जेष्ठ शिक्षक श्री. एम. एम. खराडे सर, अशोक सुर्वे, दत्तात्रय आज उदय सूर्यवंशी संभाजी पोवार, दिपक वरुटे, हसूर दुमाला, भाटनवाडी व हिरवड़े खालसा गावातील प्रतिष्ठीत नागरिक, सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आजी माजी विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर. जी. कांबळे सर यांनी आभार मानले.