गोकुळ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी थाटामाटात साजरी (विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दहीहंडीचे आयोजन)

कोल्‍हापूर (ता.०७):
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण जन्मकाळ निमित्ताने उपस्थित महिला भगिनींनी श्रीकृष्णाचा पाळण म्हंटला तसेच संघाचे संचालक शशिकांत आनंदराव पाटील-चुयेकर व त्‍यांच्‍या पत्‍नी सौ. तेजस्विनी शशिकांत पाटील–चुयेकर यांचे शुभहस्‍ते उत्सवमूर्तीस अभिषेक घालण्यात आला व सत्यनारायण पूजा करण्यात आली.
यावेळी कोगील बु.ता.करवीर येथील श्री हनुमान भजनी मंडळा मार्फत भजन, गवळण तसेच सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व श्रीकृष्ण मंदिरास व गोकुळ प्रधान कार्यालयास आकर्षक विद्यूत रोषणाई करण्‍यात आली होती.
तसेच संघाने नवीन खरेदी केलेल्या दोन बसचे पूजन व उद्घाटन संघाचे संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी संघाच्या वतीने संघ कर्मचाऱ्यासाठी प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संघाच्या उत्पादन विभाग, प्रोसेस विभाग, अभियांत्रिकी विभाग, गुणनियंत्रण विभाग, गोडावून विभाग, प्रिपॅक विभाग, डेअरी डॉक विभाग या विभागातील गोविंदा पथकांनी दहीहंडी मध्ये सहभाग घेतला होता. तर डेअरी डॉक विभागने चार थर लावून दहीहंडी फोडली.त्यांना संघाच्या वतीने प्रोत्साहनपर २५,०००/- रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

यावेळी संघाचे संचालक शशिकांत पाटील, प्रकाश पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघास बक्षीस देण्यात आले. व दहीहंडी फोडणारा गोविंदा श्री.महादेव पाटील याचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी संघाचे बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, के.एन.मोळक, आर.व्ही.पाटील, बाजीराव राणे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अमित हावलदार, अमोल गडकरी, के.एस.कदम व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!