या गावात गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
शाहूवाडी :
अणूस्कुरा (ता शाहूवाडी) येथील ग्रामपंचायत व केंद्र शाळा येथे स्वतंत्र्याचा अमृत महोत्सस्वी ध्वजारोहण

विविध शालेय परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत प्रांगणात ध्वजारोहण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मध्ये यश संपादन केलेली चिन्मय चंद्रकांत जांभळे , तर केंद्र शाळेचे ध्वजारोहण विविध वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या हर्षदा हरीश कांबळे हिच्या हस्ते करण्यात आले, गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी सरपंच दीप्ती पाटील,उपसरपंच मानसी पाटील,पोलीस पाटील मनोहर पाटील, ग्रामसेवक सुभाष पाटील, चंद्रकांत जांभळे, दीपक पाटील, मुख्याध्यापक दशरथ आयरे, कलाप्पा पाटील ,मंजूर महात
गावातील सर्व पदाधिकारी ,महिला वर्ग,शिक्षक, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.