गोकुळवर आपला हक्काचा जोतिबाचा गुलाल उधळूया : विनय कोरे

पन्हाळा :

जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या भविष्यासाठी काय निर्णय घेणार आहोत ,याचा विचार करून दूध उत्पादक या परिवर्तनाच्या लढाईला उपस्थित राहिले आहेत. आज ज्या दिशेने हा दूध संघ निघाला  आहे याला भविष्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थितीत होतो. जिल्ह्यातील भाजप सत्ताधारी आघाडीबरोबर आहे. मात्र मी लोकभवनेची कदर करून दूध उत्पादकांच्या न्यायासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहे. या  गोकुळ ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थक्रांती आहे
गोकुळवर आपला हक्काचा जोतिबाचा गुलाल उधळला पाहिजे.
. या अर्थक्रांतील आदर्शवत करण्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला खंबीरपणे पाठिंबा देऊन पन्हाळा तालुक्यातून विजयाची गुढी उभी करूया असा निर्धार
आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची पन्हाळा तालुका प्रचार सभा पालकमंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील , माजी आ. चंद्रदीप नरके, जिल्हा बँक संचालक बाबासाहेब पाटील  आसूर्लेकर यांच्यासह उमेदवार   यांच्या उपस्थितीत झाली. पन्हाळा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली.

पन्हाळा तालुक्यातून ठरावधारकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पॅनल टू पॅनल मतदान करून गोकुळच्या निवडणुकीत विजयी करून महाडिक प्रवृत्तीला या निवडणुकीतून हद्दपार करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
   

पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे. सहकारातील संस्था टिकल्या पाहिजेत. यासाठी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत. दूध उत्पादकांच्या मालकीचा संघ झाला पाहिजे यासाठी आम्ही लढा उभारला. मल्टिस्टेट थांबले नसत तर आज पॅनल उभे नसते. गोकुळमध्ये दोन रुपये चढ शेतकऱ्याला मिळावे हा उद्देश घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलोय.

निवडणूक लागलीय तर विरोधकांनी कोर्टात न जाता ही निवडणूक लढावी. हा संघ माझ्या एकट्याचा राहिला पाहिजे असे षडयंत्र सत्ताधारी आघाडीकडून केले जात होते. मात्र आम्ही ते हाणून पाडले. त्यामुळेच राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला ठराव धारकांचा पाठिंबा मिळतोय. आमदार विनय कोरे हे दिलेला शब्द पाळतात. त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. या निवडणुकीत करवीर तालुका कुठेही कमी पडणार नाही. आपणही या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करून महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करावे. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

   यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ही निवडणूक विविध कारणांनी गाजत आहे. या निवडणुकीत चित्र स्पष्ट आहे. विरोधी आघाडी गेली पाच वर्षे दूध उत्पादकांच्या न्यायासाठी सातत्याने लढत आहे. त्यामुळे विजय निश्चित असून विरोधक जाणीवपूर्वक निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्याला  दुधाला चांगला दर मिळावा यासाठी आम्ही लढतोय. या दूध संघात सत्तेचे राजकारण होत आहे. संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मालकीचा राहावा यासाठी लढलो यामध्ये आम्हाला यश मिळाले असल्याचे चंद्रदीप नरके यांनी सांगितले.गोकुळमध्ये आता उत्पादकांना परिवर्तन पाहिजे आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला प्रतिसाद मिळत असून आपल्या पॅनेलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला.

यावेळी विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे आपले मनोगत व्यक्त करताना पन्हाळा तालुक्यातून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला मताधिक्य द्यावे. पन्हाळा आणि करावीर तालुक्यातून मताधिक्य मिळाल्यावर पॅनेलचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
आभार अजित नरके यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!