कोल्हापूर :
गोकुळच्या शासननियुक्त संचालक पदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची निवड करण्यात आली. याबाबतचे आदेश शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आज आदेश जारी केला.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावचे मुरलीधर जाधव वीस वर्षांपूहन अधिक काळ शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आज गोकुळच्या शासननियुक्त संचालक पदी निवड झाल्याचे आदेश कार्यासन अधिकारी अस्मिता जावडेकर यांनी जारी केले.
शिवसेनेत गेले वीस वर्षे प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ मिळाल्याच्या भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केल्या.