छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन
करवीर :
वाकरे ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन विठ्ठल पाटील ( वस्ताद ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सई पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आणि आजची परिस्थिती या विषयावर भाषण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते.

यावेळी सदस्य कुंडलिक पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे.तसेच सत्कार मूर्ती विठ्ठल पाटील यांनी उपमहाराष्ट्र केसरी कै, पै, शंकर तोडकर असे राज्यस्तरीय मल्ल तयार केले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्ल विद्या महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठल पाटील वस्ताद यांचा, संजय गांधी निराधार योजना कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विजय पोवार, कुंभी कामगार सोसायटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नामदेव पाटील, आणि मराठा रणरागिणी सई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच शारदा पाटील,
गणेश गुरव ,विजय पोवार ,सचिन पोवार ,महादेव पाटील, तानाजी चौगले, चंद्रकांत पाटील, सदाशिव कुंभार ,आनंदा पाटील,सर्व सदस्य, मुख्याध्यापक बीके चव्हाण,डॉ. श्वेता तोडकर, तलाठी संध्या कुंभार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार उपसरपंच शारदा पाटील यांनी मानले.