महे येथे ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र यांच्या वतीने भैरवनाथ स्कूलमध्ये ‘ ग्राहक प्रबोधन ‘ कार्यक्रम
करवीर :
करवीर तालुक्यातील महे येथे ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक हित संरक्षणचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील महेकर यांच्या आयोजनाद्वारे भैरवनाथ स्कूलमध्ये ‘ ग्राहक प्रबोधन’ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महे गावचे सरपंच सज्जन पाटील होते
या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार विजय जाधव, अन्न भेसळ अधिकारी विकास सोनवणे, वैद्य मापन अधिकारी आप्पासाहेब पाटील, प्राथमिक आरोग्य अधिकारी महबूब शेख व गणेश पाटील, महेश तलाठी संतोष भिवोगडे, ग्राहक हित संरक्षणचे पदाधिकारी राज्याध्यक्ष जगदीश पाटील व अशोक ठोमके, प्रमोदनी माने, शैला कुरणे, मनीषा गुरव, संदीप सरदेसाई, गणेश धामोडकर, जनार्दन पाटील, भैरवनाथ स्कूलचे मुख्याध्यापक टी.एम.परीट सर व संस्थेचे संचालक महेश पाटील व प्रस्ताविक चौगुले सर यांनी केले. यावेळी विविध मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.