दूध संस्थांनी नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी: गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे ( राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दुध संस्था प्रतिनिधी व सचिव मेळावा)
राधानगरी :
राज्य शासनाने दुध उत्पादकांना गाय दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले असले तरी ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे .हे अनुदान संस्थांच्या माध्यमातून उत्पादकांना द्यावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत मात्र शासन ठाम राहिले तर सर्वांचीच अडचण होणार असून दूध संस्थाने राज्य शासनाच्या धोरणानुसार नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले .
घोटवडे (ता. राधानगरी) येथे राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दुध संस्था प्रतिनिधी व सचिवांच्या मेळावाप्रसंगी डोंगळे मार्गदर्शन करत होते . यावेळी बोलताना डोंगळे यांनी या अनुदानासाठी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व दुग्ध विकासमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता .शासनाने सहकार सक्षम करण्यासाठी गायीच्या दुधाला अनुदान थेट उत्पादकांना देण्याचे जाहीर केले आहे .मात्र या साठी घातलेल्या अटी जाचक आहेत . उत्पादकांना कॅशलेस व्यवहारासह आधार कार्ड व भ्रमणध्वनी लिंकिंग ची अट घातली आहे . त्याशिवाय जनावरांच्या टॅगिंगचीही अट आहे . डोंगराळ व दुर्गम भागात तर १०० रुपयासाठी दहा किलोमीटरची पायपीट करून बॅकेकडे जावे लागणार आहे . मात्र शासनाला एक यंत्रणा उभी करायची आहे . त्यामुळे शासन जर ठामच राहणार असेल तर दुध संस्था व उत्पादकांनी या बदलाला सकारात्मक सहकार्य करावे.
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी गोकुळ हा सर्वसामान्यांच्या विश्वासाचा ब्रँड असून गोकुळ नेहमीच सर्वच बाबतीत दूध उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले .कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी शासनाच्या धोरणाचे सविस्तर विवेचन केले .माजी संचालक गोकुळ भोगावती कै.रंगराव आबाजी डोंगळे यांचे फोटो पुजन करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
गोकुळ कर्मचारी पत संस्था निवडणूक बिनविरोध निवड झालेले संचालक राजेंद्र चौगले दत्तात्रय डवरी सतिश पोवार सुनिल वाडकर यांचा सत्कार चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते करण्यात आला .योगेश गोडबोले गोकुळ दूध संघाचे दैनंदिन संकलन १७ लाख लिटर्स झाले असून आता पर्यंत हे जास्त संकलन आहे असे सांगितले .
यावेळी डॉ. उदय मोगले कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के.द.पाटील यांची भाषणे झाली . यावेळी संचालक अभिजित तायशेटे, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले.संकलन मॅनेंजर शरद तुरंबेकर,डॉ.प्रकाश साळुंखे, डॉ.अशोक गायकवाड , भरत मोळे, दत्तात्रय वागरे, कृष्णात पुंगावकर संजय हळदकर आदी उपस्थित होते . आभार शरद तुरंबेकर यांनी मानले .