दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या उत्पादकांना गोकुळचे नेहमीच प्रोत्साहन : चेअरमन अरुण डोंगळे (गोकुळमार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार )

कोल्‍हापूर, ता.११ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने श्री दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी ता.आजरा या संस्थेचे दूध उत्पादक, सचिव बाळासाहेब पाटील यांनी शासनाच्या व संघामार्फत दिल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसाय संबंधी योजनांचा गावातील दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणे लाभ मिळवून दिल्याबद्दल, तारदाळ येथील कॅप्टन प्रथमेश धनाजी शिंदे यांनी इंडियन नेव्ही गोवा येथे सेवा बजावत असताना मिसाईलचे ट्रेनीग देत असताना दहा मुलांचे प्राण वाचवले बद्दल, कुमारी राखी रमेश कांबळे रा. नेर्ली हिने महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी अनुसूचित जाती मधील महिला प्रवर्गामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकवलेबद्दल तसेच संघाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मगरे व डॉ.सुभाष गोरे यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रभावीपणे राबविलेबद्दल व गोकुळचे फोरमन संदिप गणपती भांदीगरे यांनी इंजिनिअरींग विभागामधील उत्कृष्ट कामगिरी करून संघाची बचत केलेबद्दल तसेच उत्कृष्ट दूध उत्पादक प्रकाश जाधव रा. पेंढारवाडी यांचा गोकुळच्या वतीने व त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांचे हस्‍ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

      यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या दूध उत्पादकांना तसेच आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या व्यक्तींना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम गोकुळने केले आहे. सर्व सत्कारमूर्तींची कामगिरी ही कौतुकास्‍पद आहे, त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी संघाचे संचालक डॉ.चेतन नरके यांना वाढदिवसानिमित्य गोकुळ परिवारामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.

      याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


                           

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!