ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळेच्या कुटुंबीयांना गोकुळकडून एक लाखाचा धनादेश प्रदान

कोल्हापूर, ता.२८ : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नेमबाजी मध्ये कांस्यपदक मिळवले बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत १ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते या रक्कमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक यांच्या उपस्थितीमध्ये स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे व आई अनिता कुसाळे यांच्याकडे बामणी, ता.कागल येथे गोकुळच्या वतीने शनिवार दि.२४/०८/२०२४ इ.रोजी आयोजित कागल तालुका संपर्क सभेमध्ये प्रदान करण्यात आला.                    

          यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, स्वप्नील चे हे यश अभिमानास्पद असून भविष्यात स्वप्निल यशाची अनेक शिखरे पादक्रांत करून देशाचे नाव उज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले असून भविष्यात ही कार्य चालू राहील असे मनोगत व्यक्त केले व गोकुळ परिवारामार्फत स्वप्निल ला शुभेच्छा दिल्या.

          यावेळी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले की, स्वप्निल ला मिळालेले हे यश त्याचे प्रामाणिक कष्ट, मित्र मंडळींचे सहकार्य, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच हितचिंतकांचे आशीर्वाद यामुळेच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले व गोकुळ परिवाराचे ऋण व्यक्त केले.

          या कार्यक्रमावेळी उपस्थित वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व संघाचे अधिकारी आदी. तसेच दूध संस्थांचे प्रतिनिधी आधी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!