‘ गोकुळ ‘ चा बहिणीशी नात्यापलीकडचा ‘ बंध ‘ :  अनोख्या रक्षाबंधनाचे १९ वे वर्ष, 

कोल्हापूर : 

रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याची महती सांगणारा सण. सणाद्वारे  सख्या नात्याची ही वीण अधिक घट्ट होत असताना आपणास दिसते. तर दुसरीकडे रक्ताच्या नात्यापलीकडील बहिण भावाचे नातेबंध कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील भारती चिंचणे तसेच  बेलवले (ता.कराड) येथील वैशाली शिंदे यांच्याकडून  गोकुळचे चेअरमन व संचालक मंडळ यांना राखी बांधून आपले ऋणानुबंध जपलेले आहे. २००५ सालापासून आजतागायत म्हणजेच गेली १९ वर्षे हा बंध तितक्याच प्रेमाने होत आहे. 

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अधिकाऱ्यांना भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी राखी बांधत बहिण भावाचे नाते आणखी दृढ केले. हा कार्यक्रम गोकुळच्या  ताराबाई पार्क  कार्यालय येथे  पार पडला.

 यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली शिंदे व भारती चिंचणे म्हणाल्या की, गोकुळचा अशिर्वाद आमच्यासारख्‍या अनेक निराधार महिलाना लाभले आहेत. गोकुळचा ऋणानुबंध जीवनात नवीन आशा-आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण या जन्मी न फिटणारे आहे. गोकुळ परिवारास आमच्या सारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत व विश्वात गोकुळचे नाव उज्वल होवो.         

 यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, शेतकरी वाहतूक संस्थेचे चेअरमन अरविंद देसाई, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अनिल पाटील उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!