‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप…

कोल्‍हापूर ता.३१: गेल्‍या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्‍थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्‍त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ यांनी सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड इ. गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्‍याच्‍या आवारात व गोडाऊनमध्‍ये स्‍थलांतरीत केलेली आहेत. त्याकरिता गोकुळ कडून आज गुरुदत्त शुगर्स च्या छावणीला आठ टन पशुखाद्य तसेच पार्वती सूतगिरणी मौजे तेरवाड येथील छावणीतील २०० जनावरांना करिता चार टन पशुखाद्य असे एकूण १२ मे.टन महालक्ष्मी पशुखाद्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर, संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप करणेत आले. तसेच त्‍या भागातील जनावरांच्‍या छावण्यांना भेट दिली .यावेळी पूरग्रस्त छावणीतील दूध उत्पादकांनी गोकुळने पशुखाद्य उपलब्ध केल्याबद्दल समाधान व्यक्त केले

      यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून या भावनेतूनच महापुरामुळे ज्या जनावरांचे स्थलांतर करून जनावरांच्या छावण्या उभ्या केल्या आहेत. त्या छावणीतील जनावरांनकरिता पशुखाद्य वाटप करण्यात आले आहे. तसेच जनावरांच्या चारा कुटीसाठी ही गोकुळमार्फत लोडर चाफकटर उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले व या महापुराने अनेक मुक्या जनावरांना गुरुदत्त शुगर्स समूह तसेच पार्वती सूतगिरणीने दिलेला आधार हा मोलाचा आहे असे मनोगत व्यक्त केले. 

      यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, गुरुदत्‍त शुगरचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, गुरुदत्‍त शुगरचे संचालक बबन चौगले, बाळासाहेब पाटील व रमेश बुजुगडे, जवाहर पाटील, गोकुळचे अधिकारी मानसिंग देशमुख, आर.व्ही.पाटील, अशोक पाटील, सुहास डोंगळे, गुरुदत्त शुगरचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले तसेच संस्थेचे चेअरमन, दूध उत्पादक आदि उपस्थित होते.

                                                                                    
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!