स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेब यांना ‘ गोकुळ’ मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली
कोल्हापूर ता.२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच के.डी.सी.सी.बँकेचे ज्येष्ठ संचालक पी.एन.पाटील सडोलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल / गडमुडशिंगी येथे शनिवार दि.२५/०५/२०२४ इ.रोजी सर्व ठिकाणी दोन मिनटे स्तब्धता पाळून गोकुळ प्रशासनाच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिलचौधरी,सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, लेखा व्यवस्थापक एच.एम. कापडीया, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, , पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक व्ही.डी.पाटील, बोरवडे चिलिंग सेंटरचे शाखा प्रमुख व्ही.एस.कदम, लिंगनूर चिलिंग सेंटरचे शाखाप्रमुख एस.पी.गायकवाड, तावरेवाडी चिलिंग सेंटरचे शाखाप्रमुख एस.बी.चेंडके, गोगवे चिलिंग सेंटरचे शाखा प्रमुख आर.एम.खटावकर,सॅटेलाइ ट डेअरी शाखाप्रमुख श्री. पकाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.