‘गोकुळ’चे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दर्जेदार व उत्तम गुणवत्तेचे : आमदार सदानंद सरवणकर (सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईच्या विश्वस्तांची गोकुळला भेट)
कोल्हापूर (ता.०१) : श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष, माहिमचे आमदार सदानंद सरवणकर व ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) मुख्य प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवारी (दि.०१) सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार गोकुळ परिवाराच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती देऊन करण्यात आला. यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार सदानंद सरवणकर म्हणाले , गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असल्यामुळेच मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये तसेच आसपासच्या परिसरामध्ये गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ वापरणारा मोठा ग्राहक वर्ग निर्माण झाला असून भविष्यात गोकुळने मुंबई व जवळपासच्या उपनगरामध्येही आपली व्यवसायाची व्याप्ती अधिक वाढवावी असे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापन व कामाची पद्धत पाहून संघ व्यवस्थापनाचे कौतुक केले. यावेळी गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांचा हि आस्वाद त्यांनी घेतला व गोकुळच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त भास्कर शेट्टी, सुनिल गिरी, ट्रस्टचे पदाधिकारी श्रीमती विणा पाटील, संदीप राठोड, संतोष जठार, कृष्णा सर्पेकर, गोकुळचे बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.