जुळे सोलापूर येथे ‘गोकुळ’ शॉपीचे उद्‌घाटन

कोल्हापूर ता.०५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने जुळे सोलापूर येथे नवीन गोकुळ मिल्क या शॉपीचे, तसेच ५०० शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ, व पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, व मान्यवर यांच्या उपस्थित संपन्न झाला.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवतेच्या जोरावरती आपला बाजारपेठेमध्ये दबदबा निर्माण केला असून गोकुळची विविध दर्जेदार उत्पादने सोलापूर शहरात व उपनगरामध्ये उपलब्ध व्हावीत आणि उत्पादनांचा परिसरातील नागरिकांना आस्वाद घेता यावा याकरिता नवीन शॉपी निर्माण केली आहे. दूध पुरवठ्यातील सातत्य, उच्चतम, गुणवत्ता आणि नैसर्गिक चव यामुळे गोकुळच्या उत्पादनाने बाजारातील स्पर्धेची आव्हाने पेलत विक्रीचे नवे उच्चांक साधले आहेत. या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी,दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला,पिस्ता,चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार आहेत. निश्चीतच गोकुळच्या दुध व दुग्धजन्य पदार्थ याची चव आवडेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. तसेच आयोजित शस्त्र प्रदर्शनाचे कौतुक केले, निश्चितच हे प्रदर्शन सर्वांना प्रेरणादायी ठरेल असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे संचालक प्रा.किसन चौगले यांनी गोकुळ दूध संघाचा वाढता ग्राफ स्पर्धेची आव्हाने पेलत विक्रीचे नवे उच्चांक साधत आहेत. तसेच सोलापूरचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सोलापूर मध्ये ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या शॉपीच्या माध्यमातून उपलब्ध होतील असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत शॉपीचे चालक रवी मोहिते यांनी केले.

तसेच या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथील गोविंद श्री मंगल कार्यालय येथे ५०० शिवकालीन शस्त्रांची मोफत प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन राजनीती विषयी आणि युद्धनीती विषयी सामान्य नागरिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि तमाम जनतेला माहिती व्हावी म्हणून या प्रदर्शनाचे दोन दिवसाचे आयोजित केले आहे.

यावेळी उपस्थित गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, गोकुळ मार्केटिंग प्रमुख हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, शिवाजी चौगले, जयवंत पाटील प्रशांत पाटील, दत्तामामा मुळे, राकेश कदम, श्रीकांत डांगे, अरुण साठे, शॉपी चालक रवी मोहिते आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!