l
‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा त्रैवार्षिक करार : चेअरमन अरुण डोंगळे ( गोकुळ’ व संघ कर्मचारी संघटना यांचेतील त्रैवार्षिक करार संपन्न)
कोल्हापूर ता.२८.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) व संघ कर्मचारी संघटना यांच्यातील १३ व्या कर्मचारी वेतनवाढ व ञैवार्षिक करारावरती दि.२७.१२.२०२३. इ. रोजी संघाचे ताराबाई पार्क कार्यालय येथे स्वाक्षरी करण्यात आल्या. व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार कर्मचा-यांना द्यावयाची वेतनवाढ तसेच संघ कामकाजामधील इतर सेवा सुविधा आदी बाबींचा समावेश या करारामध्ये आहे. सध्याच्या महागाईच्या काळात सदरचा करार निश्चितच कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल असा विश्वास गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला. हा करार दि.३०.०६.२०२३ इ.रोजी कायम असणा-या १९९४ इतक्या कायम कर्मचा-यांना लागू असून, यामुळे सर्व कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो व आघाडीचे नेते मंडळी, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांनी धन्यवाद दिले.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, या पूर्वीचा वेतनवाढीच्या कराराची मुदत जून २०२३ इ.रोजी संपली असल्याने सन २०२३-२०२६ या कालावधीसाठी झालेल्या नवीन करारामध्ये पगारवाढ, कराराचा कालावधी, रजा, दिवाळी बोनस, गणवेश, इतर भत्ते, कालबद्ध पदोन्नती, पगाराचा फरक इ.बाबींचा समावेश करण्यात आला आहे. व्यवस्थापनाने देवू केलेल्या वेतनवाढीस तसेच करारातील इतर नियम व अटी संघटना प्रतिनिधींनी आनंदाने मान्य केल्या. या करारावरती संघाच्यावतीने चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (वित्त) हिमांशू कापडिया तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉ.शंकर पाटील,जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सेक्रेटरी सदाशिव निकम, कोल्हापूर आयटकचे अध्यक्ष एस.बी.पाटील, संघटना प्रतिनिधी मल्हार पाटील,व्ही.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पुणेकर सुहास डोंगळे, दत्तात्रय बच्चे यांनी सौहार्दपुर्ण वातावरणात त्रैवार्षिक करारावरती स्वाक्षरी केल्या.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष कॉ.शंकर पाटील, जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, सेक्रेटरी सदाशिव निकम, संघटना प्रतिनिधी व्ही.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पुणेकर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, व्यवस्थापक संगणक ए.एन.जोशी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (वित्त) हिमांशू कापडिया, प्रशासन अधिकारी बाजीराव राणे, कामगार कायदे सल्लागार अॅड.दिपक देसाई, अॅड.मुनोळकर आदि उपस्थित होते.