गोकुळ मतदान : राखीव गटातून विरोधी आघाडीचे ४ , तर सत्ताधारी गटाचे १ उमेदवार विजयी : विरोधी आघाडीची जोरदार मुसंडी
कोल्हापूर :
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या
गोकुळ दूध संघाच्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीचा राखीव गटातील ५ उमेदवारांचा निकाल नुकताच लागला. त्यामध्ये विरोधी आघाडीचे ४ निवडून आले आहेत, तर सत्ताधारी गटाचे १ उमेदवार विजयी झाला आहे. राखीव गटाच्या निवडीतून निकालाच्या सुरुवातीला विरोधी आघाडीची जोरदार मुसंडी मारली आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी
आघाडीने राखीव गटातील माजी आमदार सुजित मिणचेकर ,अमरसिंह पाटील, बयाजी शेळके व रंजना रेडेकर विजयी झाल्या . तर
सत्ताधारी आघाडीकडून शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत.
सर्वसाधारण गटाच्या मतदानाकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.