राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू
Tim Global :
राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २0२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे.
सदस्यपदासह थेट सरपंच निवड होणार असून संबधित ग्रामपंचायत मध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
निवडणुकीची नोटीस १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे . अर्ज भरण्याची मुदत २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत राहणार आहे . ५ डिसेंबरला सकाळी ११ पासून छाननी सुरू होणार आहे . ७ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत असणार आहे . यानंतर चिन्ह वाटप होईल . तर १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे . २० डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे .