गोकुळच्या वतीने मा.जिल्हाअधिकारी यांना लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करणेबाबत निवेदन देण्यात आले
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करणेबाबत संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे.
१.बाधित जनावरांची विलगीकरण करून त्याचे छावणी तयार करणे आवश्यक आहे.
२. ग्रामपंचायत मार्फत लम्पी त्वचा रोगा बाबत जनजागृती करणे.
३.ग्रामपंचायत मार्फत डास, माश्या,गोचीड, कीटक-नाशक यांचा प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करून
स्वच्छता मोहीम राबवणे.
४.गांवामध्ये आढळून आलेल्या लम्पी बाधित जनावरांच्या ग्रामपंचायत मार्फत नोंदी घेवून पशुसंवर्धन
विभागास कळवणे.
५.मृत जनावरांचा मृतदेह उघड्यावर न टाकता शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी
ग्रामपंचायतीने घ्यावी.
६.बाहेरून जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जनावरांचे लम्पी लसीकरण केल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत.
७.लम्पी आजार हा फक्त गाय वर्ग मध्ये होत असल्याने बाहेर राज्यातून म्हैशी खरेदीस शासनामार्फत परवानगी
द्यावी.
८.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील
बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची एकत्र गोकुळ च्या संचालक मंडळासोबत व अधिकारी
यांच्या सोबत लम्पी आजार बाबत आढावा मिटिंग घेण्यात यावी.
यासर्व मागण्याचे निवेदन देण्यात आले व यासर्व विषयासह लम्पी आजारा संदर्भातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच मा.जिल्हाधिकारीसो यांनी लम्पी आजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना गाव पातळीवर राबविण्या संबधी. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात येणार असल्याचे सागितले.
गोकुळ हा महाराष्ट्रातील प्रतिथयश संघ आहे.सध्या जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून संघामार्फत तो आटोक्यात आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहोत. संघामार्फत २ लाख लम्पी त्वचा रोगाची लस खरेदी करून संघाच्या कार्यक्षेत्रात सर्व गाय वर्ग जनावरांना मोफत टोचण्यात येत आहे. आज अखेर १ लाख ६० हजार पर्यंत लसीकरण झालेले आहे. सदरच्या लसीकरण करण्यासाठी संघाकडील ६० पशुवैद्यकीय अधिकारी, ४० एल.एस.एस व ४०० कृत्रिम रेतन सेवक यांची मदत घेत आहोत.तसेच बाधित जनावरांना औषध उपचार अहोरात्र सुरु आहे. गोठया मधील डास, माश्या, गोचीड इ. किटक नाशकांच्या प्रतिबंधात्मक उपयोजना सुरु आहे.पोस्टर्स परिपत्रके इ.द्वारे सर्व दूध संस्था व दूध उत्पादकांना लम्पी त्वचा रोगाबाबत जनजागृती करण्यात येत आहेत .
यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक नवीद मुश्रीफ, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश दळवी, पशुसंवर्धन उपआयुक्त वा.ए.पठाण, उपस्थित होते.