दोन सख्या भावांचा गावतळ्यात पाण्यात बुडून मृत्यू : भामटे येथील घटना
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील भामटे येथे इयत्ता तिसरी व पहिलीमध्ये शिकणाऱ्या दोन सख्या भावांचा गावतळ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ महादेव पाटील हा ९ वर्षाचा तर राजवीर महादेव पाटील हा ७ वर्षाचा होता.
दुपारी बारा वाजता ही घटना घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
समर्थ व राजवीर चे वडील आई-वडील ऊस तोडणी मजूर असल्याने आज नेहमीप्रमाणे उसाची गाडी भरण्यासाठी दोघे गेले होते. आज शाळेला सुट्टी होती. त्यामुळे हे दोघे सकाळी केस कटिंग करून आले.
याचवेळी नेहमीप्रमाणे त्यांच्या आजी शांताबाई पाटील जनावरांना डोंगरात चरून आल्यानंतर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावतळ्यावर निघाल्या होत्या, यावेळी समर्थ राजवीर हे दोघेही आजीबरोबर गावतळ्यावर आले. केस कटिंग केल्यामुळे आंघोळीसाठी ते तळ्यात उतरले. यावेळी आजी जनावरांना पाणी पाजून नेहमीप्रमाणे तळ्यातून बाहेर पडल्यावर गोठ्याकडे निघाल्या. जवळच असणाऱ्या गोठ्यावर जनावरे पोचली मात्र समर्थ व राजवीर आला नाही म्हणून आजीने शेजारचा मुलगा अथर्व पाटील याला तळ्यावर राजवीर व समर्थ ला आणण्यासाठी पाठवले. यावेळी दोघे दिसून आले नाहीत, त्याने ही घटना त्याने आजीला सांगितली. आजीने तळ्यावर धाव घेतली यावेळी हे दोघेही दिसून आले नाहीत. यावेळी आजीने हंबरडा फोडला,यावेळी जमलेले नागरिकांनी तळ्यात शोध घेतला असता खोल पाण्यात दोघांचेही प्रेत सापडून आले. ही घटना गावात समजतात गावातील नागरिकांनी तळ्यावर धाव घेतले. दोघांनाही तातडीने सीपीआर ला पाठवले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे