आता घरगुती सिलेंडरचे Domestic Gas Cylinder भाव ५० रुपयांनी महाग

Tim Global :

LPG Price Hike: देशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे.

मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.

मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

ANI
@ANI
The price of 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today. The domestic cylinder will cost Rs 999.50/cylinder from today.
8:34 AM · May 7, 2022
8.2K
Reply
Copy link

१ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही ६५५ रुपयांवर पोहोचली आहे.

यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.  १ एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २,२५३ रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, १ मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली.
देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!