प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात होणार 510 घरकुलांची निर्मिती

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती,
10 प्रकल्पांसाठी 31 कोटींचा खर्च

कोल्हापूर :

२७ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १० सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर झाले आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात ३२ कोटी खर्चातून ५१० घरकुलांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये नागरिकांना आपल्या हक्काचे घरकुल मिळणार असल्याची माहिती
गृहनिर्माण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

३० मार्च २०२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत राज्यातील २३२ सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १० प्रकल्पांचा सामवेश आहे.

नामदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ७७, गडहिंग्लज नगरपालिका ४०, इचलकरंजी नगरपालिका ४०, हुपरी नगर परिषद ४०, मलकापूर नगरपालिका १७, वडगाव नगरपरिषद ४०, कागल नगरपालिका ६३, मुरगूड नगरपालिका १०३, जयसिंगपूर नगरपालिका ४०, शिरोळ नगरपालिका ५० आदि ठिकाणी एकूण ५१० घरकुलांची निर्मिती होणार आहे.

या योजनेंतर्गत 300 चौरस फुटांच्या घराची निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख तर राज्य सरकारकडून 1 लाखाचे अर्थसहाय्य केले जाते.

‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (PMAY ) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने म्हाडा सुकाणू अभिकरण म्हणून कार्य करते. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक नागरी संस्था (ULB) यांचे एकूण २३२ सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) राज्यस्तरीय मूल्यमापन समिती आणि राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती व त्यानंतर केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीद्वारे मान्यता देण्यात आल्याची माहिती ना.पाटील यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!