फोटो प्रातिनिधिक

Tim Global :

Car- Bike Price Increases : केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये वाढ होणार असल्यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे. ही वाढ १ जूनपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय विमा नियमाक आणि विकास महामंडळाऐवजी (आयआरडीआय) मंत्रालयाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे.

थर्ड पार्टी विम्यामध्ये वाढ झाल्याने देशातील वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या किंमती या निर्णयामुळे वाढणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा अधिक खाली होणार आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार प्रमियम मोटरसायकच्या विम्यामध्ये १५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. मात्र ही वाढ १५० सीसी पेक्षा अधिक इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पल्सर, केटीएम आरसी ३९०, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि याच क्षमतेच्या गाड्यांच्या समावेश होतो.

१००० ते १५०० सीसी क्षमतेची इंजिन असणाऱ्या गाड्यांच्या थर्डपार्टी प्रमियममध्ये सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. आधीच गाड्यांच्या किंमती वाहननिर्मिती कंपन्यांनी वाढवल्याने त्या महाग झाल्या असून त्यात आता या अतिरिक्त सहा टक्क्यांचा भार थेट ग्राहकांवर पडणार आहे.१००० सीसी इंजिन असणाऱ्या नवीन गाड्यांसाठी थर्ड पार्टी विम्याची रक्कम २३ टक्क्यांनी वाढणार आहे. तर १००० ते १५०० सीसी क्षमतेच्या इंजिनच्या गाड्यांवरील प्रिमियममध्ये ११ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

कितीने वाढणार विमा….

प्रिमियम दुचाकी (१५० सीसीच्या वरील क्षमता असणाऱ्या) – १५ टक्क्यांनी वाढकार (१००० ते १५०० सीसी क्षमता असणाऱ्या) – ६ टक्क्यांनी वाढकार (१००० सीसीपर्यंत क्षमता असणाऱ्या) – २३ टक्क्यांनी वाढस्कुटर्स आणि मोटरसायकल (१५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या) – १७ टक्क्यांनी वाढ…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!