ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा २४ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय
कोल्हापूर :
१० ऑगस्ट २०२० रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवा राहणीमान भत्ता जाहीर करण्यात आला आहे. पण शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. ग्रामविकास विभागाने आर्थिक तरतूद करण्यासाठी अर्थ विभागाकडे पाठपुरावा करूनही अत्यंत तळच्या स्तरावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे राज्यभर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ( आयटक )च्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ. नामदेव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यामध्ये २४ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर अर्थमंत्री अजित पोवार.यांच्या बारामती येथील कार्यालयावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय,राज्य कमिटीच्या वतीने घेण्यात आला. २४ सप्टेंबरच्या जिल्हा परिषद कोल्हापूर वर काढण्यात येणाऱ्या मोर्च्यात सर्व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या न्याय मागण्यासाठी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करवीर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष कॉ. संतोष जाधव,व सचिव शिवाजी पोवार यांनी केले आहे.
बैठकीला बबन पाटील, संतोष जाधव, शिवाजी पाटील, सम्राट मोरे, भिकाजी कुंभार, दिनेश चौगले, रवी कांबळे,पांडुरंग दळवी, रोहित भंडारी, दिपक कांबळे, पंडीत चोपडे ,संभाजी सुर्वे, शिवाजी पोवार, सुरेश पोवार आदिसह गगन बावडा, राधानगरी, भुदरगड, करवीर,शाहूवाडी, हातकणंगले, आजरा,चंदगड,शिरोळ,गडहिंग्लज,कागल,
तालुक्यातील पदाधिकारी उपस्थितीत होते.