गोकुळकडून म्हैस दूध २ रुपये व गाय दूध १ रुपये दुधखरेदी दरात वाढ : अध्यक्ष विश्वास पाटील
कोल्हापूर:ता३०:

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये दिंनाक ०१/०८/२०२२ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यास अनुसरून म्हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २ रूपये व गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर १ रूपये वाढ केलेली आहे. दि.२७/०७/२०२२ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली .
तरी दि.०१/०८/२०२२ इ.रोजी पासून म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ४५.५० दर राहिल व गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ३०.००असा दर राहिल अशी माहिती श्री पाटील यांनी दिली.तसेच संघाचे कोल्हापूर,मुंबई,पुणे विभागामध्ये वितरीत होणा-या फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे.तसेच गाय दूध,टोण्ड दूध, स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दिनांक ३१/०७/२०२२ मध्यरात्री पासून सदर दूध विक्री दरवाढ लागू होणार आहे.
तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत.