आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले

आजपासून लागू झाली दरवाढ (फाइल फोटो)

Tim Global:

LPG Gas Cylinder Price Hike From Today: भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा झटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले, आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीसंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे.

ANI
@ANI
·
Follow
Domestic 14.2 kg LPG cylinder’s prices increased by Rs 50/cylinder with effect from today. Domestic LPG cylinder will now cost Rs 1053 in Delhi. 5kg domestic cylinder price increase by Rs 18/cylinder. 19kg commercial cylinder prices decreased by Rs 8.50.
8:34 AM · Jul 6, 2022
1.6K
Reply
Copy link

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.

एक एप्रिल रोजी १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत २५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यावेळी सिलेंडरची किंमत २ हजार २५३ पर्यंत गेलेली. तर एक मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नव्याने किंमती वाढवण्यात आल्याने याचा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!