गोकुळकडून दीपावली भेट : म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ चेअरमन विश्वास पाटील
कोल्हापूर:ता१७:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये दिंनाक २१/१०/२०२२ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यास अनुसरून म्हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २.०० रूपये वाढ केलेली आहे तर गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर ३.०० रूपये वाढ केलेली आहे. दि. १७/१०/२०२२ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
तरी दि.२१/१०/२०२२ इ.रोजी पासून म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ४७.५० असा दर तसेच गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ३५.०० असा दर राहिल अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली व पुढे बोलताना म्हणाले म्हैस व गाय दूध दर वाढ करून शेतकऱ्यांना दिवाळी निमित्ताने एक प्रकारची भेट दिली आहे असे म्हणाले तसेच गोकुळचे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक,कर्मचारी,वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीने दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.
तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत.