आमदार सरोज बाबुलाल आहिरे गोकुळ दूध संघास भेट…
कोल्हापूर:ता.२५ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास देवळाली (नाशिक) मतदारसंघाच्या आमदार सरोज बाबूलाल आहिरे यांनी सदिच्छा भेट दिल्याबद्दल गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गोकुळ प्रकल्पाची पाहणी केली.गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादक शेतक-यांसाठी राबविल्या जाणा-या सर्व योजनांची माहिती घेवून व संघामार्फत खासकरून राबवली जाणाऱ्या महिला नेतृव्व विकास या विभागच्या विविध योजने बद्दल सविस्तर माहिती घेऊन त्यांनी गोकुळ दूध संघाचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले. नाशिकमध्ये दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी गोकुळ दूध संघाने सहकार्य करावे असे मनोगत व्यक केले.
यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील,डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, डॉ.प्रवीण वाघ, नितीन जाधव, संदीप ढेकळे इतर उपस्थित होते.